‘दीड दमडी’च्या वाचकवर्गाला ‘सेव्हिंग ग्रेस ऑफ ह्यूमर’चा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही!
ग्रेसेस या शब्दाला ग्रीक पुराणात विशिष्ट अर्थ आहे, त्या तीन देवता आहेत. त्या सौंदर्य, मोहकता आणि सुख या गुणांचं त्या रक्षण करणार्या आहेत असं समजलं जातं. विनोदाचं सामर्थ्य ज्यांना ज्यांना मूलभूतपणे जाणवलं त्यांनी कदाचित ‘saving grace of humour’ असा शब्दप्रयोग अस्तित्वात आणला असेल. म्हणून असं म्हणावंसं वाटतं की, ‘दीड दमडी’च्या वाचकवर्गाला ‘सेव्हिंग ग्रेस ऑफ ह्यूमर’चा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.......